हिमत असेल तर राष्ट्रवादीने आगामी निवडणूक स्वतःच्या बळावर लढवावी

अमित परब यांचे पुंडलिक दळवी यांना आव्हान

*💫सावंतवाडी दि.०२-:* महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत असताना देखील, अनेक मुद्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवेदन द्यावी लागत आहेत. हे दुर्दैवी असल्याची टीका चराठा ग्रामपंचायत सदस्य व भाजप तालुका सचिव अमित परब यांनी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला जिवंत ठेवण्यासाठी पुंडलिक दळवी यांची धडपड सुरू असल्याचा खोचक टोला देखील अमित परब यांनी लगावला आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, हिम्मत असेल तर येणारी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस ने स्वतःच्या हिमतीवर लढवावी असे आव्हान परब यांनी दिले आहे.

You cannot copy content of this page