*💫कणकवली दि.०२-:* वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय तळेरेचे मुख्याध्यापक सुनिल घुगरे यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने शुभेच्छा समारंभ शाळा समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. याप्रसंगी संस्था ,शाळा समिती, शिक्षक,व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांडून मुख्या-सुनिल घुगरे देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सदस्य प्रविण वरुणकर,शरद वायंगणकर, निलेश सोरप, एस्.जी.नलगे, सी.व्ही.काटे, आर.पी.कांबळे, ए.बी. कानकेकर, डी.सी.तळेकर, पी.एन्.काणेकर , एन.बी.तडवी, पी.एम. पाटील, कोकरे, गावठे,केसरकर, टाकळे शिक्षकेतर प्रतिनिधी राजेश तांबे, कल्पेश तळेकर,घाडी, तळेकर आदी उपस्थित होते. या प्रसंगी प्रविण वरुणकर म्हणाले की मुख्याध्यापक घुगरे सरांनी गेली ३४ वर्षे विद्यालयामध्ये प्रदीर्घ सेवा दिली त्याचे मोल खूप मोठे आहे. इंग्रजी या विषयाचे प्रभावी अध्यापन करून त्यांनी विद्यालाचा एस. एस. सी. बोर्ड परीक्षेचा निकाल उंचावण्याचे भरीव कार्य केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या शिक्षक संघटनेतर्फे कणकवली तालुका कार्यवाह, सिंधुदुर्ग जिल्हा कोषाध्यक्ष ही पदे त्यांनी भूषविली. त्याच्या कार्याचीच पोचपावती म्हणून परिषदेतर्फे त्यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आले.असे गौरवोद्गार सहकारी शिक्षकांनी काढले. सेवानिवृत्तीपर भाषणात घुगरे यांनी संस्था,शाळा, सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उत्कृष्ट सहकार्यामुळे प्राचार्य पदाला न्याय देऊ शकलो असे भावोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.जी. नलगे, सूत्रसंचालन सी.व्ही. काटे तर आभार डी.सी. तळेकर यांनी मानले.
तळेरे हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनिल घुगरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
