१५ वित्त आयोगातून स्ट्रीट लाईट बिले भरणार नसल्याचा इशारा

कणकवली तालूका सरपंच संघटनेच्या बैठकीत निर्णय

*💫कणकवली दि.०२-:* १५ वा वित्त आयोगाअंतर्गत काम पूर्ण झाल्यावर संबधीत ठेकेदाराचे ई पेमेंट करायचे असल्याने बरीचशी कामे पूर्ण करूनही याचे पेमेंट अजून पर्यंत झालेले नाही यामुळे ई पेमेंट करताना अडचणी येत असून याबाबत कणकवली तालूका सरपंच संघटनेने रणशिंग फुंकले आहे. याबाबत आज पुन्हा कणकवली तालुका सरपंच संघटनेची बैठक संपन्न झाली ‌.या बैठकीत गावांतील स्ट्रीट लाईट दोन वर्षांची थकीत बिले भरणार नाही असा इशारा देण्यात आला असून सर्वांनुमते ठरविण्यात आले आहे ‌तसेच डाटा एंट्री ऑपरेटरांचे आपले सेवा सरकारला डीडी स्वरुपात रक्कम देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे याबाबत येत्या सोमवार 5 जुलै रोजी जिल्हा सरपंच संघटनेचे पदाधिकारी ओरोस येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पुन्हा भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. सदर बैठक कणकवली पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती यावेळी संदेश ऊर्फ गोट्या सावंत,सभापती मनोज रावराणे ,उपसभापती प्रकाश पारकर ,पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, तसेच तालूका संघटनेचे पदाधिकारी हेमंत परुळेकर, पंढरी वायंगणकर, सुहास राणे, संतोष राणे, संतोष आग्रे, प्रभाकर बांदल , सुनिंद्र सावंत, गुरूदास चव्हाण, बापू फाटक, मंगेश तळगावकर, संजय सावंत, गुरव , साक्षी परब ,रिना राणे ,मनाली गुरव ,निता तेली , सुजाता जाधव, सौ.मुंज ,आदी कणकवली तालुक्यातील सरपंच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कोरोनामुळे निधन झालेल्या भरणी सरपंच यांच्या पती कडे सरपंच संघटनेकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे ‌.संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या वतीने रक्कम सुपूर्द करण्यात आली आहे ‌.तसेच करुळ ग्रामसेवक बर्वे, त्याचप्रमाणे कोरोना काळात काही ठिकाणी उपसरपंच तसेच पदाधिकारी यांचे निधन झाले होते यासर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली ‌ स्ट्रीटलाईटची विजबिले ही वित्त आयोगामधून भरा असा आदेश शासनाच्या वतीने देण्यात आला आहे परंतु प्रत्यक्ष निधी आला 5 लाख तर दोन वर्षांचे थकीत बिले 8 लाख मग यात विकास कामे कोणती करायची याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे‌. आम .नितेश राणे यांना सुद्धा दोन दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते ‌ सर्व सरपंच यांनी याबाबत आपण अधिवेशनात आवाज उठवावा अशी मागणी केली होती आम. नितेश राणेंनी आपण येणा-या अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे सांगितले आहे.

You cannot copy content of this page