*💫सावंतवाडी दि.०२-:* दिवसेंदिवस देशात वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस, आणि खाद्य तेल यांच्या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असून, केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाहीर निषेध करत, जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना वाढलेली महागाई कमी करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, उद्योग व व्यापार महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई, रोहीणी सावंत, अन्सारीन मकानदार, अंकीता देसाई, जहिरा ख्वाजा, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, संदीप राणे, बावतीस फर्नांडिस, सुर्यकांत नाईक, राजू धारपवार, अर्षद बेग, इफ्तिकार राजगुरू, नंदू साटेलकर, नंदकिशोर नाईक, आसिफ ख्वाजा, मोहिनी देऊलकर, अजित नातू कांचन मसुरकर, स्मिता मुळीक, आदी उपस्थित होते.
वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने केंद्र सरकारचा केला निषेध
