उपजिल्हा रुग्णालयाला १०० लिटर डिझेल मोफत…

*💫वेंगुर्ला दि.०२-:* उभादांडा येथील विलास कुबल यांच्या मानसीश्वर पेट्रोल पंपतर्फे वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील जनरेटरसाठी १०० लिटर डिझेल मोफत दिले आहे. मानसीश्वर पेट्रोल पंपने ब्रावझर गाडीतून घरपोच डिझेल सुविधा सुरु केली आहे. त्याचा शुभारंभ वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील जनरेटरसाठी १०० लिटर डिझेल मोफत देऊन करण्यात आला. यावेळी डॉ. अतुल मुळे, नर्स मांजरेकर, शिवसेना शहर प्रमुख अजित राऊळ, शैलजा मुळीक, मकरंद कुबल, संग्राम धुरी आदी उपस्थित होते. फोटोओळी – मानसीश्वर पेट्रोल पंपतर्फे उपजिल्हा रुग्णालयासाठी १०० लिटर डिझेल मोफत दिले.

You cannot copy content of this page