*राष्ट्रवादी कॉंग्रेसने घातला सार्वजनिक बांधकाम विभागाला घेराव

अपूर्ण कामांबाबत विचारला जाब*

*सावंतवाडी :* सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने घेराव घालण्यात आला. आंबोली घाट दुरावस्था, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी, चौकुळ बेरडकी रस्ता, मळगाव घाट रस्ता आदींबाबत जाब विचारत धारेवर धरलं. आंबोली घाटात दरड कोसळत असून गटार, नालेसफाई झालेली नाही. यामुळेच ही दरड कोसळत असून सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्ष याला कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचा पदाधिकाऱ्यांनी केला. तर उपजिल्हा रुग्णालयातील अर्धवट कामाबाबत, चौकुळ बेरडकी रस्ता कामात झालेलं निकृष्ट दर्जाचे काम, मळगाव घाट रस्ता दुरुस्ती आदीकडे लक्ष वेधल. यावेळी कार्यकारी अभियंता माने यांनी आंबोली, चौकुळ बेरडकी इथं उद्या प्रत्यक्ष पहाणी करण्याच आश्वासन दिल. तर उपजिल्हा रुग्णालयाचा कामाची वर्क ऑर्डर ८ दिवसांत काढण्याची ग्वाही दिली. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, हिदायतुल्ला खान, राजू धारपवार, दर्शना बाबर-देसाई,बावतीस फर्नांडिस, नंदू साटेलकर, आसिफ शेख, सुरेश वडार, अर्षद बेग, जहिरा ख्वाजा, आसिफ ख्वाजा, नंदकिशोर नाईक, इफ्तिकार राजगुरू, याकुब शेख, कौस्तुभ नाईक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page