कणकवली तहसीलदार यांचे वेधले लक्ष
*💫कणकवली दि.०२-:* कणकवली तालुक्यामध्ये शासनाने जाहिर केलेल्या कोवीड दर नियंत्रण चौकशी समितीमध्ये कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डिसीएससी विभागात कार्यरत असणाऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा समावेश असावा.असे झाल्यास काही रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या अनावश्यक बीलांना आळा बसेल असे निवेदन डॉ.मिलींद म्हसकर ,भास्कर राणे परेश परुळेकर, प्रशांत राणे, साजिद कुडाळकर ,विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांनी कणकवली तहसिलदार यांना दिले आहे. या निवेदनात ते म्हणतात,कणकवली तालुक्यामध्ये शासनाने जाहिर केलेल्या कोवीड दर नियंत्रण चौकशी समितीमध्ये लेखापाल / लेखाधिकारी यांच्यामार्फत सदरच्या रुग्णालयांची / रुग्णांची बीले तपासण्यात येत आहेत . आमच्या असे निदर्शनास येत आहे की , या समितीमध्ये वैद्यकीय ज्ञान असणारी व्यक्ति समाविष्ट नाही . तरी या समितीमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील डिसीएससी विभागात कार्यरत असणाऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा समावेश असावा व ज्या रुग्णांच्या बीलांसंदर्भात तक्रारी आहेत त्या बीलांची सुध्दा सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तपासणी करण्यात यावी . असे झाल्यास काही रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या अनावश्यक बीलांना आळा बसेल व सामान्य रुग्णांना भरमसाट आकारण्यात येणाऱ्या बोलांमधून काही प्रमाणात आधार मिळेल . असे या निवेदनात म्हटले आहे.
