अन्न धान्याचे केले वाटप
*💫सावंतवाडी ता.०१-:* दिव्यांग कर्मचारी संघटनेकडून दिव्यांग व्यक्तिंना अन्न धान्य वाटप करण्यात आले.सर्वसामान्य दिव्यांगांप्रती सहानुभूती,आदर व दातृत्वाची भावना ठेवून दिव्यांग कर्मचारी संघटना शाखा सावंतवाडी तर्फे दिव्यांग व गरजू बांधवांना अन्न धान्य वाटप करण्यात आले. सरमळे – शितप, माडखोल धनगरवाडी, सातुळी, वेरले, कारिवडे- डंगवाडी, चौकुळ, आंबोली, आरोस या ठिकाणच्या सुमारे 15 ते 20 दिव्यांग बांधवांना घरपोच अन्नधान्याचे वाटप केले. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा सौ.सुरेखा परब, उपाध्यक्ष रविंद्र गुरव, सचिव संतोषराठोड, महेंद्र चव्हाण, सुचिता येजरे, अर्चना सावंत, वसिम शेख, वामन परब, सृष्टी पाटील, मालू लांबर, सूरज बागुल, विजय वानखडे, चारूशीला शेवडे उपस्थित होत्या.
