कणकवलीत अप्पासाहेब पटवर्धन चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे महामार्ग चौपदरीकरणा दरम्यान लुप्त

पोलिसांचा तिसरा डोळा निष्काम

*💫कणकवली दि.०१-:* कणकवली येथील मुख्य चौकामधील म्हणजेच आप्पासाहेब पटवर्धन चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे महामार्ग चौपदरीकरण दरम्यान गायब लुप्त झाल्याने पोलिसांचा तिसरा डोळा निष्काम ठरल्यात जमा आहे. कणकवली आप्पासाहेब पटवर्धन चौकामधील सी सी टीव्ही कॅमेरे गायब झाल्याने आत्ता पोलीस वाहतूककोंडी तसेच अनुचित प्रकारावर यावर कसा वॉच ठेवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्या कणकवली चौकातील सी सी टीव्ही कॅमेरे गायब असल्याने चौकामधील ये-जा करणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवता येत नाही तसेच कुटली वस्तू गहाळ झाली किंवा चोरीला गेली असल्यास या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातूनच ती शोधता येते .कोणत्याही व्यक्तीचा अथवा वाहनाचा शोध घ्यायचा असेल तर शहरातिल मुख्य चौकातील सी. सी. टी.व्ही कॅमेरेच उपयोगी येतात .शहरात इतर ठिकाणी म्हणजेच झेंडा चौक, कांबळे गल्ली रस्ता, पटकी देवी ,कणकवली कॉलेज रोड, नरडवे रोड ,रेल्वे स्टेशन अशा मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे हे कार्यरत आहेत पण शहरातील मुख्य चौकांमध्ये हे कॅमेरे नसल्याने पोलिस वॉच कसा ठेवणार असा प्रश्न निर्मा झाला आहे यास संदर्भात पोलीस अधिकारी यांच्या कडून माहिती घेतली असता काही महिन्यापूर्वी कार्यरत असणारे हे कॅमेरे शहरातील ब्रिज चे काम चालू असल्याने काढून ठेवण्यात आले असून तांत्रिक अडचणी दूर करून पुन्हा कॅमेरे लावण्यात येतील असे सांगण्यात येत आहे

You cannot copy content of this page