उपसरव्यवस्थापक तथा सिंधुदुर्गाचे सुपुत्र सुबोध मोरये यांचे सौजन्य
*💫सावंतवाडी ता.०१-:* महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीच्या वतीने सिंधुदुर्ग सुपुत्र तथा उपसरव्यवस्थापक सुबोध मोरये यांच्या सौजन्याने मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांला 200 मास्क व 50 फेस शिल्ड दत्तात्रेय साबाजी ठाकूर यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डाँ अदिती ठाकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ पावसकर,आरोग्य सेवक जे टी राणे, लिपिक मनोज सातार्डेकर आदी उपस्थित होते.
