मालवण पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी मोहिमेची व्यसनमुक्ती अभियानाने सांगता

मालवण : (प्रतिनिधी) ‘एक पल का नशा, जीवनभर की सजा’ असा नारा देत मालवण पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेची व्यसनमुक्ती अभियानाने सांगता करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांनी उपस्थित नागरिक, रिक्षा व्यावसायिकांना संबोधित केले. १ ते ३० जून या कालावधीमध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहिम पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर मालवण भरड नाका येथे या मोहिमची जनजागृती करून सांगता करण्यात आली. अंमली पदार्थ सोडण्याचा निश्चय केला पाहिजे. दारू, अफू, गांजा आदी अंमली पदार्थ सेवन करणार नाही असे मनाकडे पक्के ठरवा, असे ओटवणेकर यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील, हवालदार बाबा गिरकर, हेमंत पेडणेकर, पोलीस नाईक कैलास ढोले, अजय येरम, वाहतूक पोलीस गुरू परब, अंमलदार प्रतीक जाधव, प्रसाद आचरेकर, देवेंद्र ढोलम, होमगार्ड जॉयल फर्नांडिस यांच्यासह रिक्षा व्यावसायिक, नागरिक उपस्थित होते. फोटो : मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने व्यसनमुक्ती अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली.

You cannot copy content of this page