*💫सावंतवाडी दि.३० -:* सावंतवाडी तालुक्यात आज २८ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात २७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात एकच रुग्ण सालई वाडा भागात सापडला असून, ग्रामीण भागात बांदा ९, मळगाव १, आरोंदा १, धाकोरे १, इन्सुली ६, चौकुळ ३, सांगेली १, सातार्डा १, किनळे १, कोलगाव २, वेत्ये १ असे रुग्ण सापडले आहेत. तर सद्य स्थितीत तालुक्यात ३८५ रुग्ण सक्रिय आहेत.
