नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ.अशोक कदम यांचा सेवानिवृत्तीपर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केला सत्कार

*💫कणकवली दि.३०-:* सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागात चांगली माणसं काम करत असल्यामुळे कोरोना महामारीत नागरिकांना सेवा देऊ शकलो. त्यातीलच एक हरहुन्नरी डॉ.अशोक कदम हे चांगल्या रितीने काम करत होते. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट व नजीकच्या ग्रामीण भागांमध्ये कोरोना महामारीत त्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे.आरोग्य विभागात त्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी केले. नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ.अशोक कदम यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने जिल्हा रुग्णालयात त्याचा सत्कार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी नेत्र शल्य चिकित्सक डॉ.सोनवणे,औषध निर्माता अनिलकुमार देसाई,नेत्र चिकित्सा अधिकारी राजेंद्र केळकर,जिल्हा रुग्णालय कार्यालय लिपिक दिगंबर देसाई आदी उपस्थित होते. डॉ. अशोक कदम यांनी आरोग्य विभाग रोहा येथे गेल्या ३२ वर्षांपूर्वी सेवेला सुरुवात केली.त्यानंतर कुडाळ ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय,कणकवली उपजिल्हा रुग्णालय,फोडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी गेली ३२ वर्ष १ महिना अशी सेवा बजावली आहे.विशेष म्हणजे गेल्या वर्षी पासून कोरोना महामारीत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली असल्याने त्यांचे सेवानिवृत्तीदिनी कौतुक केले जात आहे.

You cannot copy content of this page