वैश्यवाणी समाजाला न्याय मिळणार:प्रमोद जठार
*💫कणकवली दि.३०-:* वैश्यवाणी हिंदू -वैश्य ,हिंदू -वाणी असे शाळेच्या दाखल्यावर नमूद असलेल्या लोकांना ओबीसी दाखले मिळण्यासाठी राज्यमागास आयोग यांच्याकडे परत प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करून वैश्यवाणी समाजाला न्याय द्यावा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.अशी माहिती माजी आम.प्रमोद जठार यांनी दिली. वैश्यवाणी समाजाच्या ओबीसी दाखले मिळवण्यासाठी येणारा अडचणी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नेतृत्वामध्ये काल वैश्यवाणी ओबीसी कृती समिती अध्यक्ष सुनील खाड्ये ,सचिव विकास संसारे यांनी निवदेन दिले .त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी तातडीने ३०जून २०२१ रोजी सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे ,प्रधान सचिव -सामाजिक न्यायमंत्री ,प्रधान सचिव -ओबीसी मंत्रालय सबंधित विभागाचे अधिकारी व माजी आमदार प्रमोद जठार ,वैश्यवाणी ओबीसी कृती समिती अध्यक्ष व सचिव यांची संयुक्त सभा घेऊन वैश्यवाणी समाजला ओबीसी दाखले मिळण्यासाठी येणारा अडचणीबाबत सखोल चर्चा झाल्यानंतर वैश्यवाणी हिंदू -वैश्य ,हिंदू -वाणी असे शाळेच्या दाखल्यावर नमूद असलेल्या लोकांना ओबीसी दाखले मिळण्यासाठी राज्यमागास आयोग यांच्याकडे परत प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करून वैश्यवाणी समाजाला न्याय द्यावा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.अशी माहिती माजी आम.प्रमोद जठार यांनी दिली.
