होते जेष्ठ शिवसैनिक:गावावर शोककळा
वैभववाडी प्रतिनिधी कोकिसरे गावचे माजी उपसरपंच व जेष्ठ शिवसेना कार्यकर्ते गोविंद जांभवडेकर यांचे अल्पशा आजाराने ओरोस जिल्हा रुग्णालयात दुःख निधन झाले. मनमिळावू व्यक्तिमत्व असल्याने अनेक माणसे जोडली होती. त्यांनी 5 वर्षे कोकिसरे गावचे उपसरपंच पद यशस्वीपणे सांभाळले होते. गावातील विकासप्रक्रियेत आणि सामाजिक कार्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. एक साधा सरळ विनयशील समाजसेवक कार्यकर्ता अशी त्यांची तालुक्यात ओळख होती. त्यांच्या अकाली निधनाने कोकिसरे गावावर शोककळा पसरली आहे.
