राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील १५४२ विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदेचे आयोजन

*💫सावंतवाडी दि.३०-:* लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत राज्यातील नऊ विभागातुन अकरावी व बारावीच्या १५४२ विद्यार्थ्यांनी विक्रमी सहभाग नोंदवून एक वेगळाच विक्रम केला. राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदेच्यावतीने मराठी व इंग्रजी या दोन भाषेत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील नाशिक विभागातुन ३३१ , अमरावती विभागात ३०२, मुंबई विभागातुन २५३, पुणे विभाग १९७, कोल्हापूर विभाग १७४, लातुर विभाग १६२, औरंगाबाद विभाग ५४, नागपूर विभागात ५० तर अती दुर्गम अश्या कोकण विभागातुन १९ विद्यार्थी सहभागी झाले होते. राज्यशास्त्र परिषद राज्यात विद्यार्थी व शिक्षक यांच्या हिताचे विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. भविष्यातही अनेक विद्यार्थी व शिक्षक यांच्या हिताचे कार्यक्रम करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुमित पवार यांनी सांगितले. स्पर्धा यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. संजय सुतार, तंत्र विभागाचे व राज्य संशोधन प्रमुख आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रमुख प्रा. अविनाश यमगर, स्पर्धा समन्वयक प्रा. शाम दुसाने, स्पर्धा प्रसिद्धी प्रमुख प्रा. राम बागुल व स्पर्धा तंत्रस्नेही प्रमुख प्रा. गिरीष लोंढे, राज्य उपाध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे, प्रा. शरद जोगी, कार्याध्यक्ष संजय सुतार, सचिव डॉ. पितांबर उरकुडे, कोषाध्यक्ष स्मिताताई जयकर सहसचिव सुनिल राठोड, व राज्य कार्यकारिणी सदस्य तसेच सर्व विभागीय अध्यक्ष व सचिव तसेच कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य त्याच बरोबर छत्तीस जिल्ह्यातील अध्यक्ष, सचिव कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धा यशस्वीतेसाठी परीश्रम घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन अध्यक्ष प्रा.सुमित पवार यांनी केले.

You cannot copy content of this page