सिंधुदुर्गासाठीच नव्हे, देशासाठी ‘अभियान ‘ दिशादर्शक ठरेल

दळवी महाविद्यालयात रक्तदान शिबिरात विनायक दळवी यांचे आवाहन

*💫कणकवली दि.३०-:* विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय आणि स्व.सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा रक्तपेढी, जि.रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले होते.सामाजिक भान राखत दळवी महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात 42 रक्तदात्यांनी भाग घेतला, त्या यापैकी 25 जणांना रक्तदान करता आले. कार्यक्रमाची सुरुवात सुरेश तळेकर यांनी दीप प्रज्वलित करून केली. विनायक दळवी यांनी शब्दबद्ध केलेले महाविद्यालयगीत ओंकार बर्वे यांनी गायिले.महाविद्यालयाची विकासगाथा कु. क्षितिजा तळेकर हिने पीपीटीद्वारे सादर केली. श्रीपाद वेलिंग, समन्वयक यांनी पाहुण्यांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले. जयप्रकाश परब या वेळी म्हणाले, “कोरोनामुक्त सिंधुदुर्ग करायचा असल्यास टेस्टिंगचा विरोध न करता, सर्वांनी टेस्टिंग करण्यासाठी सहकार्य करावे, तसेच दळवी महाविद्यालयाने स्थापिलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्रात मार्गदर्शन करण्यासाठी आपण येवू असे ते म्हणाले. माजी पोलीस निरीक्षक सूर्यकांत तळेकर म्हणाले, ‘स्व. सुनिल तळेकर चॅरि. ट्रस्ट यांच्या समन्वयातून आपण जे रक्तदान शिबिर आयोजित केले ते सध्याच्या काळात फार महत्वपूर्ण आहे. सौ. साक्षी सुर्वे म्हणाल्या, रक्ताची कमतरता पडू नये म्हणून आपल्या कडून प्रशासनाला छोटीशी मदत करून खारीचा वाटा आपण उचलला आहे, तो महत्वाचा आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनायक दळवी म्हणाले , होलिस्टिक वेलनेस ही संकल्पना वर्षभर महाविद्यालयात राबवली जाते, त्या पैकी हिमोग्लोबिन वाढावे म्हणून हीमोग्लोबिन टेस्ट करून घेतले जाते, सल्ला दिला जातो जेणेकरून पुढील रक्तदान शिबिराच्या वेळेस रक्तदान करता यावे. राज्यपाल, सहसचिवपदी काम करतांना अनेक उपक्रम त्यांनी अस्तित्वात आणले. जसे कल्चरलसाठी ‘इंद्रधनुष्य’, डिझास्टर मॅनेजमेंट साठी ‘आव्हान’, सायंटिफिक कन्वेंशनसाठी ‘आविष्कार’ ‘अभियान’ हा उपक्रम राहून गेला होता त्याचे पायलेट रन झाले होते. मे महिन्यात महाविद्यालय बंद असल्याने व सर्वाधिक नियोजित शस्त्रक्रिया होत असल्याने रक्ताच्या दुष्काळ असतो. गेल्या पाच वर्षातील दर पंधरवाड्याची रक्ताची सरासरी गरज पाहून रक्तदान शिबिराचे योजनाबद्ध नियोजन केल्यास तसेच अभियानअँप’ च्या माध्यमातून रक्तगट, रक्तदाते, रक्ताची उपलब्धता या बद्दलची माहिती क्षणार्धात मिळाल्यास सिंधुदुर्गात कधीही, कुठेही, केव्हांही रक्ताची उपलब्धता होईल. कठीण प्रसंगी होणारी धावपळ थांबेल व रक्ताअभावी कुणाचे प्राण जाणार नाहीत. म्हणून ‘अभियान सिंधुदुर्गासाठीच नव्हे तर भारतासाठी दिशादर्शक ठरेल’ असे विनायक दळवी यांनी बोलतांना व्यक्त केले. या आवाहाना नंतर सुधीर पुराणिक, संचालक एनएसएस विभाग मुंबई विद्यापीठ यांनी फोन करून, एनएसएस विभाग दळवी महाविद्यालयाच्या सहकार्याने हे ॲप बनवेल अशी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात सुरेश तळेकर यांच्यावतीने विनय पावस्कर म्हणाले , “स्व. सुनिल तळेकर चॅरि. ट्रस्ट व स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून पंचवीस वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहोत. दळवी महाविद्यालय सिंधुदुर्ग रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने हे कार्य असेच पुढे चालू ठेवू अशी ग्वाही देतो”. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तेजल कुडतरकर (तृतीय वर्ष बी एससीआय टी) हिने केले. पाहुण्यांचा परिचय नरेश नरेश पटकारे यांनी केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हेमंत महाडीक यांनी केले. चेतन नेमण (एनसीसी विभाग प्रमुख) नितिष गुरव (डीएलएलई )व नरेश शेट्ये (एनएसएस कार्यक्रम अधिकारी) यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page