उद्या होणार ऑनलाईन पद्धतीने पुरस्काराचे वितरण
*💫वेंगुर्ला दि.३०-:* संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन २०१७-१८ यात वेंगुर्ला तालुक्यातील कुशेवाडा ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. दरम्यान या पुरस्काराचे वितरण १ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत यांनी दिली आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी महासूल मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, ग्राम विकास मंत्री, राज्यमंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता, राज्यमंत्री ग्रामविकास, अप्पर मुख्यसचिव (पाणीपुरवठा व स्वच्छता ), अप्पर मुख्यसचिव (ग्रामविकास ), सह सचिव (स्वच्छ भारत मिशन), पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय यांची उपस्थिती असणार आहे. दरम्यान हा पुरस्कार जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या दालनात ऑनलाईन पद्धतीने ग्रामपंचायत कुशेवाडा सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या हस्ते स्वीकारणार आहेत. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, वेंगुर्ला पंचायत समिती सभापती, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (स्वच्छता), गटविकास अधिकारी वेंगुर्ला उपस्थित राहणार आहेत.
