मळेवाड कुंभारवाडी येथील घटना
*💫सावंतवाडी ता.३०-:* मळेवाड कुंभारवाडा येथे अनिल मुळीक यांच्या घराच्या बाजूला असलेल्या विहिरीत मादी जातीचा बिबट्या पडला असल्याचे सकाळी साडेपाच चा सुमारास निदर्शनास येताच एकच खळबळ उडाली होती. याबाबतची माहिती वन अधिकाऱ्यांना प्राप्त होताच. वन्य अधिकारी धुरी व त्याचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. यावेळी वरची मळेवाड ग्रामस्थ आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून त्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढले आहे. यावेळी गावचे सरपंच हेमंत मराठे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
