मळगाव धाबा सर्कल जवळील घटना
*💫सावंतवाडी दि.२९-:* झाराप-पत्रादेवी बायपासवर मळगाव येथील स्वामी धाबा सर्कल लगत अचानकपणे रस्त्यावर आलेल्या बैलाला इनोव्हा कारची धडक बसल्याने बैल जागीच गतप्राण झाला. या अपघातात इनोव्हा कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. ही कार बांदा येथून वेंगुर्ला येथे जात होती. अचानकपणे बैल आडवा आल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न कार चालकाने केला मात्र धडक एवढी जोरदार बसली की बैल जागीच कोसळला. मळगाव सुतारवाडी येथील देवानंद मेस्त्री यांच्या मालकीचा हा बैल होता. ऐन शेतीच्या हंगामात बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
