कोरोना लस घेतलेल्या नागरिकांना गोव्यात जाण्यासाठी आरटीपीसीआर नको

सेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांची मागणी

*💫सावंतवाडी दि.२९-:* गोव्यात नेहमी ये-जा करणाऱ्या नोकरीसाठी किंवा अन्य कामासाठी जाणाऱ्या येणाऱ्यानी कोविड प्रतिबंधक लस घेतली असेल तर त्यांची पुन्हा आरटीसीपीआर तपासणीची सक्ती केली जाऊ नये अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली आहे. सिंधुदुर्गातून (स्थानिक) गोव्यात नोकरीसाठी किंवा अन्य कामासाठी जाणाऱ्या येणाऱ्यानी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे. काहीनी दोन्ही डोस घेतले आहेत अशा सर्वांना सवलत दिली जावी. त्यांना रॅपिड किंवा आरटीसीपीआर टेस्टची सक्ती केली जाऊ नये. याकडे सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत खासदार विनायक राऊत आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधणार असून यावर लवकरात लवकर मार्ग काढण्याची विनंती त्यांना करणार आहे. कोविड नियमावलीचे पालन करण्याची सक्ती केली जावी मात्र टेस्टची सक्ती केली जाऊ नये असे राऊळ यांनी सांगितले.

You cannot copy content of this page