स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात शाहू महाराज जयंती साजरी

*💫मालवण दि.२६-:* मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिमखाना प्रमुख प्रा. एच. एम. चौगले यांनी शाहू महाराजांच्या कार्याची माहिती देऊन महाराजांचे कार्य विशद केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य प्रा. के. के. राबते यांनी शाहू महाराजांच्या जीवनातील आठवणी विशद केल्या. याप्रसंगी एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. एच. चौगुले, प्रा. सुमेधा नाईक, प्रा. डॉ. यु. वाय. सामंत, प्रा. डॉ. डी. व्ही. हारगिले, प्रा. हसन खान, प्रा. डॉ. एम. आर. खोत, कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. अन्वेषा कदम, प्रा. धामापूरकर, प्रा. मिलन सामंत आदी उपस्थित होते. आभार प्रा. बी. एच. चौगुले यांनी मानले.

You cannot copy content of this page