तिलारी कार्यकारी अभियंता रोहित कोरे ः नुकसानग्रस्त परिसराची केली पाहणी
*💫बांदा दि.२५-:* रोणापाल खुटवळ भागातील भातशेती व हत्ती ग्रास गवताचे तिलारी कालव्याची भिंत कोसळून नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास भरपाई तर देणारच परंतु सदर ठिकाणी असलेल्या नाल्यासाठी रिटेनिंग वॉलची भिंत घालून पाण्याचा प्रवाह भातशेतीत येणार नसल्याचे नियोजन करू, असे आश्वासन तिलारी कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी दिले. दुधाळ जनावरांसह थेट तिलारी कार्यालय गाठण्याचा इशारा शेतकरी योगेश केणी यांनी दिला होता. मात्र त्यापूर्वीच तिलारी कार्यवारी अभियंता रोहित कोरे, उपअभियंता मुग्दल, कनिष्ठ अभियंता अजित पाटील, ठेकेदार राजेंद्र म्हापसेकर, निगुडे उपसरपंच गुरूदास गवंडे, दाजी केणी यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
