*💫बांदा दि.२५-:* आरोसम माऊली मंदिरात विश्व हिंदु परिषद प्रखंड सावंतवाडी मार्फत गरजूंना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. यावेळी विश्व हिंदु परिषदेचे सावंतवाडी प्रखंड मंत्री लक्ष्मीकांत कराड, जिल्हा कोषाध्यक्ष रवी सातवलेकर, सुनिल सावंत, आरोस ग्रा.पं.सदस्या मनीषा परब, माजी सरपंच केशव नाईक, माजी उपसरपंच बाबी परब, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, शिवसेना मळेवाड माजी विभागप्रमुख गुरूनाथ नाईक, शाखाप्रमुख राजन परब, शिवाजी परब, बाळा नाबर, दिलीप नाईक, प्रवीण आरोसकर, आनंद परब, नंदू परब, संजीवन आरोसकर आदी उपस्थित होते. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. ‘जगा आणि जगू द्या’ असा मंत्र यावेळी देण्यात आला. बाळा परब, देवेंद्र कुबल, शिक्षक शैलेश परब, संदेश देऊलकर, मनसे आरोस विभागप्रमुख मंदार नाईक, किरण नाईक, गुरूप्रसाद गाडगीळ, यशवंत नाईक, मुकुंद धारगळकर, बंड्या आरोसकर, सुंदर पटेकर, निरंजन नाईक, सुधीर नाईक, निखिल नाईक यांच्या मदतीने जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक निखिल नाईक यांनी केले तर आभार बाळा परब यांनी मानले.
आरोसमध्ये गरजुंना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप
