*💫कणकवली दि.२५-:* कणकवली तालुक्यातील भिरवंडे बिवणेवाडीतील टेंबकर घराण्यातील मंगेश बाळकृष्ण सावंत यांचे मुंबई (ठाणे) येथे 24 जुन रोजी दुपारी 1 वाजता रेल्वे अपघातात निधन झाले. मुंबई येथील नामांकित लिफ्ट कंपनी येथे मॅनेजर पदावर कार्यरत असताना गावातील तरूण बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिले.गावातील सामाजिक ,शैक्षणिक, धार्मिक व इतर सर्व कार्यक्रमात ते सहभागी असायचे. तरुणांचा आधारवड म्हणून ओळखले जाणार्या या व्यक्तीमत्वच्या जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.प्रताप पांडुरंग सावंत यांचे ते पुतणे असून मुंबई येथील अरूण भगवान सावंत यांचे व कणकवलीतील शासकीय ठेकेदार हेमंत सावंत व पत्रकार संजोग सावंत यांचे ते चुलत भाऊ होत.त्यांच्या पश्चात आई ,पत्नी ,दोन मुलगे, दोन विवाहित बहिणी,दोन काका, काकी ,भावंडे असा परिवार आहे.
रेल्वे अपघातात भिरवंडे बिवणेवाडीतील मंगेश सावंत यांचे निधन
