*💫मालवण दि.२४-:* मालवण तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र व ग्रामीण भागातील महा ई सेवा केंद्र गुरुवारपासून सकाळी ११ ते ४ या वेळेत सुरू राहणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांनी मास्क परिधान करून व सोशल डिस्टन्सिंग पाळून यावे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी नजीकच्या महा ई सेवा केंद्रात जाऊन आपल्या शासकीय कामांची पूर्तता करावी, असे आवाहन तहसील प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
मालवणात सेतू सुविधा केंद्र सुरू
