*मळगांव विलगीकरण कक्षासाठी लुपिन कडून अत्यावश्यक वस्तू भेट*

*💫सावंतवाडी दि.२४-:* मळगाव ग्रामपंचायतने सुरू केलेल्या विलगीकरण कक्षासाठी लुपिन फाउंडेशन या संस्थेकडून अत्यावश्यक वस्तु भेट देण्यात आल्या आहेत. करण्यात लुपीनचे अधिकारी महेशकुमार चव्हाण यांनी या वस्तू सरपंच स्नेहल जामदार व उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत. या मध्ये पीपीई कीट, थर्मल गन, ऑक्सिमीटर यासह इतर अत्यावश्यक वस्तूंचा समावेश होता. यावेळी ग्राम विकास अधिकारी संदीप बांदेकर, ग्रामपंचायत कर्मचारी हरिश्चंद्र आसयेकर, ग्रामस्थ सुधाकर नाईक, रंजन केणी, रामचंद्र देवळी, हरेश मळगावकर, श्रद्धा मळगावकर, कविता कोरगावकर, सतीश राऊळ, शंकर राउळ, यशवंत सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page