नेमळे विलगीकरण कक्षासाठी लुपिन कडून अत्यावश्यक वस्तू प्रदान

*💫सावंतवाडी दि.२४-:* नेमळे ग्रामपंचायतच्या विलगीकरण कक्षासाठी लुपिन फाउंडेशन संस्थेकडून अत्यावश्यक वस्तु प्रदान करण्यात आल्या आहेत. लूपिनचे अधिकारी महेशकुमार चव्हाण यांनी या वस्तू सरपंच विनोद राऊळ यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत. यात पीपीई कीट, थर्मल गन, ऑक्सिमीटर यासह इतर अत्यावश्यक वस्तूंचा समावेश आहे. यावेळी ग्रामसेवक राजेश परब, तलाठी अरुण पाटोळे, आरोग्य सेवक बी. टी. जाधव, आरोग्यसेविका नंदा मेस्त्री, कृषी अधिकारी सुषमा देसाई, कृष्णकांत परब, ग्रामपंचायत लिपिक राजाराम गवस, शिपाई सुरेश राऊळ, गौरव मुळीक, सुनील राऊळ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page