ग्रामपंचायतीकडून रस्ता दिवाबत्ती आणि पाणीपुरवठा थकित बिलाच्या वसुलीसाठी विशेष मोहीम

विज पुरवठा खंडित करू लागू नये म्हणून महावितरण कंपनीकडून विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय*

*💫कुडाळ दि.२४-:* जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडे रस्ता दिवाबत्ती व पाणीपुरवठा योजनेच्या विज बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याची वसुली करता यावी, यासाठी महावितरणकडून विशेष वसुली मोहीम राबवण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामपंचायतीकडून थकित वीज बिल भरण्यासाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये प्रत्यक्ष भेट देऊन, शासन परिपत्रकाची प्रत देऊन विज बिल भरण्याची विनंती करण्यात येणार आहे. त्यामुळे विज पुरवठा खंडित करण्याचा कारवाईला टाळण्यासाठी सबंधित ग्रामपंचायतींनी रस्ता दिवाबत्ती आणि सार्वजनिक पाणी पुरवठा विज बिल थकबाकी रक्कम तात्काळ भरावी असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.

You cannot copy content of this page