*💫मालवण दि.२४-:* पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या हिवाळे येथील लक्ष्मी नारायण गावडे या महिला रुग्णाला अति दुर्मिळ अशा बॉम्बे रक्तगटाच्या रक्ताची आवश्यकता भासल्यानंतर मालवण रेवतळे भागातील युवक आणि बॉम्बे ब्लडग्रुपचे रक्तदाते श्री. पंकज संतोष गावडे यांनी रक्तदान करून महिलेचे प्राण वाचविल्याची घटना घडली आहे पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटल मध्ये उपचार घेणाऱ्या हिवाळे येथील लक्ष्मी नारायण गावडे या महिला रुग्णाला रक्ताची गरज होती. रुग्णाची रक्त तपासणी केली असता रक्तचाचणी मध्ये रुग्णाचे रक्त ओ पोजीटीव्ह किंवा ओ निगेटिव्ह सुद्धा आढळत नव्हते. नंतर रक्तपेढीचे तंत्रज्ञ श्री.सुमित मुकादम यानी सदरच्या रक्तनमुन्याची सखोल तपासणी केली असता ही रुग्ण बॉम्बे रक्तगटाची असल्याचे निदर्शनास आले. बॉम्बे ब्लड ग्रुप हा अतिदुर्मिळ रक्तगट असुन या रक्तगटाचे दहा लाखांमध्ये ४ रक्तदाते सापडतात. अशा परिस्थितीमध्ये आत्यावश्यक रक्ताची दुर्मिळता लक्षात घेवुन रुग्णाच्या नातेवाईकाना मानसीक तणाव येवु नये म्हणुन एस एस पी एम लाईफटाईम हॉस्पिटलचे डॉक्टर बावणे यांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सचिव किशोर नाचणोलकर आणि सहखजिनदार अमेय मडव यांच्याकडे आधी संपर्क साधला. त्यांनी तातडीने मालवणचे सुपुत्र तथा बॉम्बे ब्लडग्रुपचे रक्तदाते श्री. पंकज संतोष गावडे यांना संपर्क केला. तातडीने श्री. पंकज गावडे हे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रकाश तेंडोलकर आणि कुडाळ-वेंगुर्ला विभागीय संघटक आणि नियमित प्लेटलेट डोनर श्री यशवंत गावडे यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचले. रक्ताच्या अत्यावश्यक तपासण्या झाल्यानंतर श्री. पंकज गावडे यांनी अमूल्य आणि सर्वात दुर्मीळ असे रक्तदान केले आणी त्यानंतर सदर रुग्णाची अन त्याच्या नातेवाईकांची प्रत्यक्षभेट घेवुन त्याना सविस्तर माहीती देवुन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आपल्या सोबत असल्याचा धीर दिला. यापुर्वी ऑक्टोबर २०२० मध्ये श्री पंकज गावडे यांचे बॉम्बे रक्तगटाचे रक्त विशाखापट्टणम येथे रवाना करून तेथील रुग्णाचे प्राण वाचविले होते. यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रकाश तेंडोलकर, एस एस पी एम लाईफटाईम हॉस्पिटलचे डीन डॉ. आर. एस. कुलकर्णी, डॉ. गोपाल, डॉ. आविष्कार, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सचिव किशोर नाचणोलकर, रक्तपेढीचे डॉ. बावणे सर, कुडाळ-वेंगुर्ला विभागीय संघटक आणि नियमित प्लेटलेट डोनर श्री यशवंत गावडे, रक्तपेढीचा स्टाफ आदि उपस्थित होते.
अतिदुर्मिळ रक्तगटाच्या पंकजने वाचविले महिलेचे प्राण
