एक जखमी:एक मृत;आवाडा येथील रमेश नाईक यांचे लाखोंचे नुकसान;भरत दळवी यांची माहिती
*💫दोडामार्ग दि.२२ सुमित दळवी-:* तेरवण मेढे बंधाऱ्यातून अचानक तिलारी नदी पाञात पाणी सोडल्याने घोटगे येथील काॅजवेवर पाणी वाढले त्यामुळे शेत नांगरणी करुन रेड्यांना आवाडा येथे घेऊन जात असताना अचानक आलेल्या पाण्यामुळे दोन्ही रेडे खाली कोसळले यातील एक रेडा कसाबसा जखमी होऊन बाहेर पडला पण एक रेडा पाईप मध्ये अडकून मरण पावला त्यामुळे आवाडा येथील शेतकरी रमेश नाईक याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.सोमवारी राञी साडेसात वाजता ही घटना घडली अशी माहिती भरत दळवी यांनी दिली आहे.
