*💫सावंतवाडी दि.२१-:* अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या कोल्हापूर येथील संशयित आरोपीस जिल्हा विशेष न्यायाधीश यांनी २५ हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला. संशयित आरोपीच्यावतीने अॅड. वैभव चव्हाण यांनी काम पाहिले. याबाबत कणकवली तालुक्यातील संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपीस अटक करण्यात आली होती. दरम्यान त्याची पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. दरम्यान आज संशयित आरोपींच्यावतीने जिल्हा विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता आरोपीचे वकील अॅड. वैभव चव्हाण यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपीस जिल्हा विशेष न्यायाधीश सिंधुदुर्ग यांनी सशर्त जामीन मंजूर केला.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपीस सशर्त जामीन मंजूर
