सेनेच्या आनंदोत्सवावर अजय गोंदावळे यांची टिका
*💫सावंतवाडी दि.२१-:* जिल्ह्यातील दुकाने व बाजारपेठा सुरू झाल्यानंतर शिवसेनेने सावंतवाडी व बांदा येथे आज फटाके वाजवून केले. हे स्वागत म्हणजे “आयजीच्या जीवावर बायजी उदार, असच म्हणाव लागेल, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केली आहे गोंदावळे म्हणाले, जिल्ह्यातील बाजारपेठा सुरू होण्यासाठी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी इशारा दिला होता. त्यानंतर पालकमंत्र्यांना तसा निर्णय घ्यावा लागला. मात्र आता फुकाचे श्रेय घेण्याचे काम शिवसेनेचे पदाधिकारी करत आहेत. या ठिकाणी गेले अडीच महिने बाजारपेठा बंद होत्या त्या सुरू करण्यासाठी प्रशासन आडमुठे धोरण घेत होते, मात्र व्यापाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन नगराध्यक्ष संजू परब यांनी प्रसंगी गुन्हे दाखल झाले तरी चालतील आम्ही बाजारपेठा उघडणार अशी भूमिका घेतली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन करत बाजारपेठा उघडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे सर्व काही भाजपच्या आंदोलनाचे यश आहे, मात्र दुसरीकडे आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके लावले आणि याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, हा प्रकार म्हणजे दुसऱ्याची सिरीयल असल्यासारखा आहे असाही आरोप गोंदावळे यांनी केला आहे.
