ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती

अतुल काळसेकर;नियोजनासाठी चित्रा वाघ उद्या सिंधुदुर्गात

*💫कुडाळ दि.२१-:* ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे व वेळकाढू धोरणामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला न्यायालयाकडुन स्थगिती मिळाली असल्याची टीका भाजपाचे प्रांतीक सदस्य अतुल काळसेकर यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत करून ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात भाजपाच्यावतीने २६ जून रोजी राज्यभर करण्यात येणाऱ्या आक्रोश आंदोलनाच्या नियोजना संदर्भात भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर उद्या मंगळवार २२जून रोजी येत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आक्रोश आंदोलनासंदर्भात नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अतुल काळसेकर यांनी सांगितले की, फडणवीस सरकारच्या ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम रहावे या करीता आमचे फडणवीस सरकार प्रयत्नशील होते. मात्र त्यानंतर सरकार बदललं व आताच्या महाविकास आघाडी सरकारने याबाबत कोणतीच कार्यवाही केली नाहीच, कायदाही बनविण्यात आलेला नाही. सलग पाच ते सहा महिन्यात आठ वेळा मुदत वाढवून घेतली मात्र यावर कोणतीच भूमिका न घेतल्याने अखेर न्यायालयाने ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे या समाजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याला सर्वस्वी जबाबदारी महाविकास आघाडी सरकार आहे. तसेच या राजकिय आरक्षणाबरोबर नोकरीमधील पदोन्नतीचे आरक्षण या समाजाला मिळणार नाही असे त्यांनी सांगितले. चौकड:- आरक्षण विरोधी राज्य सरकार- अतुल काळसेकर मराठा समाजाचे ही आरक्षण हे सरकार टिकू शकले नाही. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण या सरकारने घालविले. त्यामुळे हे सरकार आरक्षण विरोधी सरकार असल्याची टीका अतुल काळसेकर यांनी केली. राज्यभर या ओबीसी आरक्षणाच्या स्थगिती विरोधात व राज्य सरकारच्या भूमिकेच्या विरोधात आक्रोश आंदोलन भाजपच्यावतीने घेण्यात येणार असून यासाठी नियोजन करण्यासाठी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या मंगळवार दि. २२ जुन रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून कुडाळ एम. आय. डी. सी. विश्रामगृह येथे होणाऱ्या बैठकीत ओबीसी आरक्षण विषयात मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या सोबत जिल्हा अध्यक्ष राजन तेली व प्रदेश कार्यकारणी सदस्य अतुल काळसेकर हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत दिली जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, तालुकाध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, जिल्हा कायम निमंत्रित राजू राऊळ, युवा मोर्चाचे अध्यक्ष रुपेश कानडे मोहन सावंत तसेच राजा धुरी, राकेश कांदे, अविनाश पराडकर, राजवीर पाटील उपस्थित होते. फोटो:-

You cannot copy content of this page