कोरोना नियंत्रणासाठी ग्राम पंचायत-ग्रामस्थाचा निर्णय;रॅपिड टेस्टमध्ये एक बाधित
*💫वेंगुर्ले दि.२१-:* रेडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पुकारलेल्या जनता संचार बंदीला उस्फुर्त प्रतिसाद लाभला असून विनाकारण फिरणाऱ्या चौतीस नागरिकांची रॅपिड टेस्ट केली असून एक व्यक्ती कोरोना बाधित आढळला आहे. रेडी गावांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे रेडी गावातील कोरोणा बाधित रुग्णांची संख्या कमी होऊन रेडी गाव कोरोणा मुक्त करण्याच्या दिशेने ग्रामपंचायत व ग्रामपंचायतीच्या वतीने दिनांक २१ जून ते २६ जून २०२१ पर्यंत सहा दिवस रेडी गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधी मध्ये जे ग्रामस्थ किंवा इतर कारणाशिवाय फिरणार असतील तर त्या लोकांची रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे आज सकाळी रेडी गावात संचारबंदी लागू करण्यात आली. सकाळ पासून रेडीगाव सामसुम होता रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच ग्राम सदस्य इतर पदाधिकारी उपस्थित राहून रस्ता बंद करण्यात आला होता. त्याठिकाणी रस्त्याने ये-जा करणाऱ्या रॅपिड टेस्ट करण्यात आली यामध्ये ३४ लोकांची एकूण दिवसभरात करण्यात आली असून एक कोरोणा बाधित रुग्ण आढळला आहे. मात्र आज रेडी गावांमध्ये सगळी दुकाने, हॉटेल्स, लहान-मोठे व्यावसायिकांनी सर्व आपली अस्थापना बंद ठेवून गावात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. याबाबत सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नामदेव राणे, जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, नंदू मांजरेकर सर्व ग्रामपंचायत सदस्य आरोग्य विभाग पोलीस कर्मचारी रेडी गाव कोरोणा मुक्त होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
