खारेपाटण कोविड सेंटरला कौसर खान यांजकडून जम्बो ऑक्सिजन सिलेंडर भेट

*💫कणकवली दि.१९-:* खारेपाटण येथे लोकसहभागातून निर्माण करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला कुडाळ येथील दानशूर व्यक्तिमत्व व अँकुरेट इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजचे उद्योजक कौसर नूर भाई खान यांनी जम्बो ऑक्सिजन सिलिंडर भेट दिला. सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांच्याकडे हा जम्बो ऑक्सिजन सिलेंडर कौसर भाई खान यांनी सुपूर्द केला. खारेपाटण येथील कोविड सेंटर मध्ये सध्या १५ पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत असून या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन सिलेंडर संपला होता.कोविड सेंटरमधील डॉक्टरनी सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांना याबाबत माहिती दिली. यावेळी रफिक नाईक यांनी कुडाळ येथील उद्योजक कौसर भाई खान यांना याबाबत माहिती दिली. श्री. खान यांनी दातृत्वातून खारेपाटण कोविड केअर सेंटर मधील रुग्णांसाठी एक जम्बो ऑक्सिजन सिलेंडर भेट दिला. याबरोबरच खारेपाटण कोविड सेंटरमध्ये सध्या रिक्त झालेले सिलेंडर देखील भरून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

You cannot copy content of this page