मालवण तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजन
*💫मालवण दि.१९-:* “राहुलजी काे लाना है, देश काे बचाना है” “राहुल काे लाना है, किसानों को बचाना है “अशा घाेषणा देत राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून मालवण तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मालवण तहसील कार्यालयासमोर शनिवारी साजरा करण्यात आला. केंद्र सरकारच्या जुलमी राजवटीपासून देशाला बाहेर काढायचे असेल तर राहुल गांधी पंतप्रधान बनले पाहिजेत असे सांगत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, शहरअध्यक्ष जेम्स फर्नांडिस, सेवादल अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, संदेश कोयंडे, बाबा मेंडीस, सरदार ताजर, शेखर डिचोलकर, मधुकर लुडबे, लक्ष्मीकांत परुळेकर, संजय धुरी, महेश शिंदे, गोविंद चव्हाण, महेंद्र मांजरेकर, उदय लुडबे आदी उपस्थित होते.
