*💫वैभववाडी दि.१९-:* मांगवली येथे हृदयद्रावक घटना घडली असून गावी आलेल्या तरुणाचा ओहाळातील बंधाऱ्यावरुन जात असताना तो पाय ओहळात पडल्याने बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. सिद्धेश रामचंद्र हेगिष्टे ( वय २७ )असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.मिरगाची राखण देण्यासाठी सिद्धेश मांगवली सिद्धवाडी या आपल्या गावी आला होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. तसेच शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. सिद्धेश नवी मुंबई ऐरोली येथे कामानिमित्त वास्तव्यास होता. दरवर्षीप्रमाणे मिरगाची राखण देण्यासाठी मांगवली सिद्धवाडी या आपल्या गावी आला होता. शनिवारी सकाळी 11 वाजता तो शेतात लावलेली झाडे बघण्यासाठी जात होता. ओहाळातील बंधाऱ्यावरुन जात असताना तो पाय घसरुन पडला. दरम्यान त्याच्यासोबत लहान मुलगा होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बंधाऱ्यावरून तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेलो. सोबत असलेल्या मुलग्याने या घटनेची माहिती घरी दिली. नातेवाईकांनी नदीपात्रात शोधाशोध केली. घटनास्थळापासून साधारणता 200 मीटर अंतरावर झुडपामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. पोलिसांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा केला. व मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव, राजू जामसांडेकर, गणेश भोवड, श्री. शिंदे, श्री. वानोळे आदी उपस्थित होते. मयत सिद्धेश याच्या पश्चात आई, भाऊ व बहीण असा परिवार आहे. त्याच्या निधनाने मांगवली गावात व्यक्त होत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार श्री. पडीलकर करत आहेत.
बंधाऱ्यावरुन पाय घसरून ओहळात पडल्याने मांगवली येथे तरुणाच बुडून मृत्यू
