लोकांना मोफत वाटप करणार; मालवण प स, सरपंच संघटनां, रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर आणि निलक्रांती संस्थेचा पुढाकार
*💫मालवण दि.१९-:* मालवण तालुक्यात कोरोना बाधितांची तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढल्याने मालवण तालुका कोरोना मुक्तीसाठी मिथिलीन ब्ल्यू या औषधाचा वापर करण्यात येणार असून तालुक्यातील लोकांना हे औषध मोफत वाटप करण्यात येणार आहे. हा उपक्रम मालवण पंचायत समिती, रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, निलक्रांती संस्था व तालुका सरपंच संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे, तालुक्यात या औषधाचा वापर करून त्यावर अभ्यासही केला जाणार असून मिथिलीन ब्ल्यू मोफत वाटपाचा हा भारतातील पहिलाच उपक्रम असणार आहे, अशी माहिती निलक्रांती संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर व मालवणचे सभापती अजिंक्य पाताडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मालवण पंचायत समिती येथे मिथिलीन ब्ल्यू औषध वाटपा बाबत माहिती देण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, निलक्रांती संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर, भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेश मांजरेकर, नगरसेवक गणेश कुशे, विलास सामंत, दीपक सुर्वे आदी उपस्थित होते. यावेळी रविकिरण तोरसकर म्हणाले, पंचायत समिती सभापती, उपसभापती यांनी डॉ. विवेक रेडकर यांची भेट घेऊन मिथिलन ब्ल्यू औषधाबाबत माहिती घेतली. मालवणातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मिथिलीन ब्ल्यू हे औषध परिणामकारक ठरू शकते. म्हणूनच पंचायत समिती, रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर, निलक्रांती संस्था व सरपंच संघटना यांच्या माध्यमातून मिथिलीन ब्ल्यू औषध लोकांपर्यंत मोफत पोहचविण्याचे ठरविण्यात आले. तालुक्यातील सुमारे ६५ हजार लोकांपर्यंत हे औषध वाटप करण्यात येणार असून रेडकर हॉस्पिटल व निलक्रांती संस्था याचा पुरवठा करेल. लोकसहभागातून हा उपक्रम राबविनण्यात येणार असून त्याचा अर्धा खर्च रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर करणार आहे. मिथिलीन ब्ल्यू औषधाचे ६ हजार लिटर सोल्युशन मोफत देणार आहे. तसेच या औषधाच्या परिणामाबाबत रिसर्च करण्यात येणार असून कोणाला औषधामुळे त्रास जाणवल्यास उपचारासाठी डॉक्टर प्रतिनिधीही या उपक्रमाचा ऍक्शन प्लॅन मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. यासाठी डॉक्टर संघटनेचेही सहकार्य घेणार आहोत, असेही तोरसकर म्हणाले. तालुक्यात कोरोनाचा कहर वाढला असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी ऍक्शन प्लॅन गरजेचा आहे. यासाठी डॉ. रेडकर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मिथिलीन ब्ल्यू औषध तालुक्यात सर्वांना मोफत देण्यात येणार असून कोरोना मुक्त तालुका करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी दानशूर व्यक्ती व संस्था यांनीही सहकार्य करावे. येत्या आठ दिवसात या उपक्रमाची कार्यवाही करण्यात येईल असे सभापती अजिंक्य पाताडे यांनी सांगितले. तर हे औषध वापरण्याची माहिती तज्ज्ञांनी द्यावी, सरपंच संघटनेमार्फत मिथिलीन ब्ल्यू बाबत लोकांमध्ये मार्गदर्शन करण्यात येईल, असे महेश मांजरेकर यांनी सांगितले. कोरोनावरील उपचारासाठी मिथिलीन ब्ल्यू औषधाला सरकारची अद्याप मान्यता नसली तरी हे औषध सरकारच्या नियमावलीत येण्याची वाट बघेपर्यंत लोकांचे होणारे मृत्यू बघायचे का ? असा सवाल रविकिरण तोरसकर यांनी उपस्थित या औषधाची जनजागृती लोकांमध्ये करण्यात येणार असून औषध घ्यावे की नाही हे लोकांनी ठरवावे, असे तोरसकर म्हणाले. तालुक्याची कोरोना स्थिती पाहता मिथिलीन ब्ल्यू औषध परिणामकारक ठरू शकते म्हणूनच पंचायत समिती या औषधाचा पुरस्कार करत आहे. जनतेसाठीच आम्ही धोका पत्करत असून कारवाई होईल म्हणून थांबणार नाही असे सभापती अजिंक्य पाताडे यांनी सांगितले.
