वजराट येथील महावितरण कर्मचाऱ्यांचा व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा भाजप तर्फे सन्मान

*💫वेंगुर्ला दि.१८-:* वजराट गावातील महावितरण कर्मचाऱ्यांचा तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचा चागल्या कामगीरी बद्दल वेंगुर्ला भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. तालुक्यात 20 दिवसापूर्वी आलेल्या तोक्ते चक्री वादळामुळे वजराट गावामधील वीज पुरवठा खंडित झाला होता, खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वजराट येथील वायरमन श्री. राकेश नारायण नाईक यांनी अथक परिश्रम घेऊन 2 दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत केला तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, श्री.रवींद्र मोरे, प्रविण गावडे यांनी कोरोना काळात चांगल्या प्रकारे सेवा बजावली त्यामुळे त्यांच्या या कामगिरी बद्दल भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्नाा उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, विश्व हिंदु परिषदेचे अरुण गोगटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आरोग्य सेवक व नर्स यांना विश्र्व हिंदू परिषदे मार्फत पिपिई किट देण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. विजय नळेकर, ता.चिटनीस नितीन चव्हाण, श्री. वामन भोसले, श्री.वसंत परब, श्री.राजन परब, आरोग्य सेवक, श्री शेखर कांबळी, सिस्टर सौ.धरणे मॅडम, अल्मेडा मॅडम, व ग्रामस्थ आदी उपस्थितीत होते.

You cannot copy content of this page