सोळाशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त
*💫मालवण दि.१८-:* आचरा येथे गोवा बनावटीची दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आचरे पोलिसांनी आचरा वरचीवाडी येथे टाकलेल्या छाप्यात १६६० रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आचरा पोलीसांना यश मिळाले आहे. आचरा पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार आचरा येथे गोवा बनावटीची दारू विक्री जोरात सुरु असल्याची चर्चा सुरू होती. यादृष्टीने परमीट दारु विक्री वाल्यांनी याकडे पोलीसांचे लक्ष वेधले होते. यावेळी वरचीवाडी येथील गुरुप्रसाद जनार्दन आचरेकर वय ४६ हे गोवा बनावटीची दारु विकत असल्याची खबर मिळाल्यावरुन गुरुवारी आचरा वरचीवाडी येथे टाकलेल्या छाप्यात मलकडाँल व्हिस्की व लेमन होडका या गोवाबनावटीची सुमारे १६६० रुपयांची दारु जप्त करण्यात यश आले आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड काँन्स्टेबल महेश देसाई, हेड काँन्स्टेबल बाळू कांबळे, महिला पोलिस जयश्री मलमे आदी सहभागी झाले होते.
