अन्यथा आंबोलीतील सर्व दुकाने सुरु करण्यात येतील;सरपंच पालेकर, उपसरपंच नार्वेकर यांचा इशारा
*💫आंबोली,दि.१८-:* आंबोलीतील गेली ३ वर्षे पर्यटन व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत.त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शासनाने योग्य तो विचार करून पर्यटन व्यावसायिकांना आणि पर्यटकांना परवानगी द्यावी.ग्रामपंचायत सर्व कोरोना नियम आणि काळजी घेवून सहकार्य करणार आहे.अन्यथा १ जुलै ला आंबोलीतील दुकाने सुरू करण्यात येतील असा इशारा सरपंच गजानन पालेकर आणि उपसरपंच दत्तू नार्वेकर यांनी दिला आहे. आंबोलीत ३ वर्षांपूर्वी घाट पडल्याने नुकसान झाले.आणि गेली २ वर्षे कोरोना मुळे नुकसान झाले. वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे येथील जवळपास ३०० छोटे मोठे व्यावसायिक धंदा करतात.त्यात अनेक छोटे व्यावसायिक हे कणीस विकून पावसाळ्यात पुंजी जमा करून वर्षभर उदरनिर्वाह करतात.कोरोना मुळे २ वर्षे सगळ ठप्प झाले आहे. त्याआधी घाट पडला त्याला ४ महिने विनाकारण लावून नुकसान करण्यात आले.स्थानिक आमदारांनी कोणतेही ठोस उपाययोजना आणि जलदगतीने काम होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.आंबोली माझे दुसरे घर म्हणणारे फक्त निवडणुकी पुरती. आंबोलीत मोठे उद्योग आणि रोजगार आणणार म्हणून घोषणा केल्या. मंत्रिपद असताना त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे भौगोलिक वातावरण आणि संरचना यामुळे उर्वरित कोकण भागासारखे इथे उत्पन्न मिळत नाही. फक्त पर्यटनावर काय तो रोजगार चालतो.मात्र तो ही कमी कमी होत चालला असताना त्यात आता कोरोना मुळे भर पडली आहे.सध्या कोरोना कमी होत आहे.इथल्या पर्यटन व्यावसायिकांची स्थिती खराब होत आहे.अनेकांनी हॉटेल साठी बँक कर्ज घेतले.तर अनेकांना यामुळे रोजगार नसल्याने वाईट परिस्थिती आली आहे.त्यामुळे ग्रामपंचायत ने सर्व पर्यटन व्यावसायिकांना कोरोना नियम पाळून सर्व खबरदारी,थर्मल गण आणि जबाबदारीने व्यावसाय करण्यास पाठींबा दर्शवला आहे.त्यामुळे शासनाने याची तातडीने दखल घेवून पर्यटन व्यावसायिकांना हॉटेल उघडण्यास परवानगी द्यावी.अन्यथा १ जुलै पासून सर्व सुरू करण्यात येईल.असा इशारा सरपंच गजानन पालेकर आणि उपसरपंच दत्तू नार्वेकर यांनी दिला आहे.
