मसुरे परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी कर्मचाऱ्यांनि घेतलेली मेहनत कौतुकास्पद !

राष्ट्रवादी काँगेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे यांचे प्रतिपादन

*💫मालवण दि.१८-:* तौक्ते चक्री वादळा नंतर मसुरे परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी वीज वितरण कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. वेळी – अवेळी येथील कर्मचारी ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी राबत असतात. अशा कर्तव्य तत्पर कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सत्कार करण्यात येत आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे यांनी येथे केले. वीज वितरण कंपनीचे मसुरे भागातील तंत्रज्ञ अमित बागवे, रुपेश सावंत, विनोद परब यांचा डॉ. साठे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमोद कांडरकर, मिलिंद घाटगे, निलेश ठाकूर, स्वप्नील ठाकूर, मंगेश चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page