नांदगाव वाशिनवाडीत तहसीलदार व सभापती यांनी दिली भेट

अति जोखीम घरांना प्राधान्य देण्याची सभापती मनोज रावराणे यांची ग्वाही

*💫कणकवली दि.१७-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव वाशिनवाडी येथील लक्ष्मण आत्माराम मोरये व भरत आत्माराम मोरये या बंधूंच्या राहत्या घराची अतिवृष्टीमुळे पडझड झाली होती दोघांचे मिळून ९४,४००/- रुपयेचे नुकसान झाले होते. याची माहिती मिळाल्यानंतर कणकवली सभापती मनोज रावराणे,तहसीलदार आर.जे.पवार यांनी भेट देऊन पाहणी केली आहे यावेळी उपसभापती प्रकाश पारकर ,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी वारंग, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, ग्रामविकास अधिकारी हरमळकर आदी उपस्थित होते. लक्ष्मण आत्माराम मोरये हे अपंग असून वयोवृद्ध आहे आणि घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे यात राहतं घर मातीचे व संपूर्ण जीर्ण झालेले असल्याने या अतिवृष्टीमुळे पडझड झाली आहे या दोन्ही भावांचे कच्चा मातीच्या ड घरकुल यादीत नावे आहेत यांना काही महिन्यांतच मंजूर मिळणार आहे तेव्हा अशी अति जोखीम घरांना आम्ही पहिल्यांदा प्राधान्य देण्यात येईल असे सभापती मनोज रावराणे यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page