*कोरोनाला रोखण्यासाठी रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षासह सदस्यांनी सहभाग घ्यावा

जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांचे आवाहन

*💫ओरोस दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोव्हिड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोव्हिड प्रतिबंधात्मक नियंत्रणात्मक कामकाजामध्ये सर्व पदाधिकारी, रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी सहभाग घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे. यावेळी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हंटले आहे की, सद्यस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोव्हिडचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत ग्रामस्तरावरती सर्वेक्षण करून जास्तीत जास्त प्रमाणात कोव्हिड रुग्णांचे लवकरात लवकर निदान करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. कोव्हिड रुग्णांचे निदान हे लवकर झाल्यास रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. गृहविलगीकरना मध्ये असलेले कोव्हिड दूषित रुग्ण हे विलगीकरनात राहिले नाही. तर कोव्हिड विषाणू समाजात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हास्तरावरून प्रत्येक ग्रामपंचायत विलगीकरण कक्ष स्थापन करणे बाबत सुचित केले होते. त्यानुसार अनेक ग्रामपंचायतीनी ग्राम विलगीकरण कक्ष स्थापन केले आहेत. ग्रामस्तरावर कोव्हिड दूषित आढळलेल्या रुग्णांना ग्राम विलगीकरण कक्षामध्ये ठेवल्यास त्यांना योग्य चिकित्सा योग्य वेळेत मिळू शकते. कोव्हिड रुग्णांच्या संपर्कात इतर सामान्य व्यक्ती, दुर्धर, असंसर्गजन्य आजार असलेले व्यक्ती यांच्यामध्ये कोव्हिडचा प्रसार वाढत चाललेला आहे. ग्राम स्तरावरील सर्व ग्रामस्थांची कोव्हिड चाचणी करणे आवश्यक आहे. याकरिता ग्राम स्तरावरील अधिकाधिक ग्रामस्थांना आपण आपल्या स्तरावर समुपदेशन व मार्गदर्शन करून कोव्हिड चाचणी करून घेण्याकरिता प्रवृत्त करावे व आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे अशी विनंती यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page