भाजपच्या कोविड सेंटरला अडथळा का निर्माण करता?
*💫कणकवली दि.१७-:* विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात सुसज्ज असे कोविड सेंटर भाजपाच्यावतीने उभारले जाईल असे सांगीतले होते.त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी पहिल्यांदा तीन जागा दिल्या.आम्ही सुसज्ज कोरोना सेंटर करणार,त्यात ऑक्सिजन पाईपलाईन करणार,आयसीयू तयार करणार हे कळल्यावर पहिल्या दिलेल्या जागा रद्द करून दुसऱ्या देतो म्हणून सांगितले.आम्ही त्यांना आजही शहराच्या ठिकाणी जागा नसेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या जागा द्या म्हणून सांगत आहेत, जेणेकरून आम्ही उभी केलेली यंत्रणा कोरोना नंतर सुद्धा सर्वांच्या उपयोगी येईल मात्र प्रशासन जागाच देत नाही. त्यांना आमचे सहकार्य घ्यायचे नाही आणि स्वतः काही करायचे नाही अशी अवस्था आहे.प्रशासनाने आपले अपयश जनतेच्या आणि व्यापाऱ्यांच्या माथी मारू नये.असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी दिला. कणकवली येथे ऑनलाईन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी संवाद साधला ते म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना आणि लोकांचे जात असलेले प्राण याला सर्वस्वी सत्ताधारी आणि प्रशासन जबाबदार आहे.कोणतीही उपाययोजना नाही.योग्य नियोजन नाही.एक फिजिशियन डॉक्टर सुद्धा जिल्हात आणण्याची या सत्ताधाऱ्यांची क्षमता नाही. त्यामुळेच राज्यात आजही सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड हे जिल्हे कोरोनाचे रेड झोन आहेत.असे असताना सत्ताधारी आणि प्रशासनाची सुरू असलेली दडपशाही या पुढे खपवून घेतली जाणार नाही.व्यापार बंद ठेवून तुमचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करू नका,भाजपा जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या सोबत आणि पाठीशी उभी राहून सरकार विरोधात लढा देईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड हे तिन्ही जिल्हे कोरोना रेड झोन मध्ये आहेत. ज्या शिवसेना पक्षाला कोकणाने सत्तेत नेऊन बसविले.मुख्यमंत्री केले त्या कोकणात आणि रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारोच्या संख्येने लोकांचे कोरोनाने मृत्यू झाले.अजून किती दिवस जनतेने वाट पाहावी ? राज्यातील इतर जिल्हात कोरोना नियंत्रणात आणला, तुम्हाला ते शक्य नसले तर अपयश मान्य करा आणि आत्मपरीक्षण करा.तुम्ही एक फिजिशियन डॉक्टर जिल्ह्यात आणू शकत नाही.यातून तुम्हाला राजकीय पाठींबा नाही हे दिसते.अशी टीका पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर केली.या पुढे मात्र आम्ही थांबणार नाही.तुमच्या अपयशामुळे जनतेने का त्रास भोगावा ? व्यापार बंद झाले त्याला कोण जबाबदार दुकानाचे भाडे, लाईट बिल, बँकांचे हप्ते,कामगारांना पगार हे सर्व देण्यासाठी व्यवसाय सुरू असला पाहिजे तोच बंद आहे.आणि त्यांच्यावर १०ते २० हजार रुपयांचा दंड करण्याचे आदेश आपण देता. हे किती दिवस चालणार कधी कोरोनावर नियंत्रण मिळविणारी.यापुढे भाजपा जिल्हातीत व्यापाऱ्यांना वेठीस धरू देणार नाही. जिल्हात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी टास्कफोर्स मागवा, तोपर्यत तरी फिजिशियन आणा आणि उपचार द्या.पंधरा वीस दिवस उपचार घेऊन सुद्धा लोक मरतात हे तरी थांबवा.गेल्या अडीज महिन्यात ७१५लोक कोरोनाने मयत झाले.त्याला हे सत्ताधारी आणि प्रशासन जबाबदार आहे.असे राजन तेली म्हणाले.
