आय एल पी एल कंपनीतर्फे शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला वॉशिंग मशीन भेट

*💫वेंगुर्ले दि.१७-:* आय एल पी एल मायनिंग कंपनीच्या वतीने शिरोडा उपजिल्हा रुग्णालय ला गेली 2 वर्ष गरज असलेली वॉशिंग मशीन देण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांच्या पुढाकाराने ही मशीन उपलब्ध झाली आहे. ह्या वेळी कंपनीचे अधिकारी श्री. नायडू, श्री. कामत सर, महेश राणे, शिरोडा उपजिल्हा रुग्णालय मधील डॉक्टर देसाई मॅडम, डॉक्टर शेटकर, प्रितेश राऊळ, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच राहुल गावडे, शिरोडा उपजिल्हा रुग्णालय मधील कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page