परदेशी असलेल्या मुळ सावंतवाडीवासिय मदतीसाठी धावले

कोरोना विरुद्ध लढयासाठी स्नेहल प्रभूकेळूसकर पुढाकार;आठ लीटरचा ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर व एन ९५ मास्क केले उपलब्ध

*💫सावंतवाडी दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्हातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या बधता आता मुळ सावंतवाडीचे असलेले नागरिकांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. अशाच आयर्लंड मध्ये स्थाईक झालेल्या स्नेहल प्रभुकेळुस्कर आणि मित्र परिवार यांनी रो.डॉ.अभिजित वझे यांच्या कडे 8 लिटरचा आॕक्सिजन काॕन्सट्रेटर आणि N95 मास्क पाठवुन दिले. रो.डॉ.अभिजित वझे स्वतः रोटेरीयन असल्याने रोटरी अध्यक्ष रो.डॉ.राजेश नवांगुळ यांच्या सल्ल्यानुसार हा “आॕक्सिजन काॕन्सट्रेटर” उप-जिल्हा रुग्णालय सावंतवाडीला देण्याचा समारंभ वैधकीय अधिक्षक डॉ.पाटील यांच्या उपस्थितीत रोटरी-अध्यक्ष रो. डॉ. राजेश-नवांगुळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी स्नेहल प्रभुकेळुस्कर आणि मित्र परिवार यानी पाठविलेले मास्क देखील उप-जिल्हा रुग्णालय आणि रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांना वाटण्यात आले. यावेळी रोटरी अध्यक्ष रो.डॉ.राजेश नवांगुळ यानी स्नेहल प्रभुकेळुस्कर आणि मित्र परिवार आणि रो.डॉ.अभिजित वझे यांचे आभार मानले. आजवर दोन आॕक्सिजन काॕन्सट्रेटर उप-जिल्हा रुग्णालयाला देता आले आणि करोना विरोधीच्या या लढ्यात खारीचा वाटा उचलून आॕक्सिजन न मिळाल्याने होणारे मृत्यू टळू शकतील या बद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी रोटरी सचिव रो.दिलीप म्हापसेकर, रो.डॉ.अभिजित वझे, रो.प्रमोद भागवत, रो.वसंत करंदीकर आणि रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थितीत होते. रो.दिलीप म्हापसेकर यानी उपस्थितांचे आभार मानले.

You cannot copy content of this page