दोडामार्ग उपसभापती पदी सुनंदा धरने बिनविरोध

दुसऱ्या वेळी मिळाली संधी

*💫दोडामार्ग दि.१६-: सुमित दळवी-:* दोडामार्ग प. स. उपसभापती पदी पुन्हा एकदा सुनंदा धर्णे यांची बिनविरोध निवड झाली आहे.पक्ष धोरणानुसार धनश्री गवस यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसभापती पद रिक्त होते. त्यामुळे आज उपसभापती पदी एकच अर्ज आल्यामुळे दोडामार्ग प. स. उपसभापती पदी सुनंदा धर्णे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले यावेळी गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, तसेच निवडणूक विभागाचे कुबल आदी उपस्थित होते. शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, सभापती संजना कोरगांवकर, माजी उपसभापती धनश्री गवस, सेना उपजिल्हा प्रमुख गणेशप्रसाद गवस तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित उपसभापती सुनंदा धर्णे यांचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page