सलग तिसऱ्या दिवशी पावसाने मालवणला झोडपले

*💫मालवण दि.१६-:* अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस मुसळधार पावसाने मालवण तालुक्याला झोडपून काढले असतानाच आज सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने मालवणला झोडपून काढले. काल रात्रभर पावसाबरोबरच वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे नागरिकांची झोप उडाली. आज सकाळपासून देखील पावसाने आपला जोर कायम ठेवला आहे. तर सकाळी वाऱ्यांचाही जोर दिसून आला. अलीकडेच तौक्ते वादळाचा सामना करणाऱ्या मालवणवासीयांच्या उरात या वाऱ्यांमुळे धडकी भरली. दुपारी पावसाचा जोर अधिक वाढल्याने मालवणातील रस्ते जलमय झाले होते. तर अनेक सखल भागात पाणी भरले होते. शहरात गटारे खोदाईचे काम अपूर्ण असल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचत आहे. नागरपालिकेकडून सध्या गटार खोदाईचे काम सुरू आहे. मात्र नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page